गाडी लावण्यावरून झालेल्या वादात महिलेसह चौघांना मारहाण
रत्नागिरी :- गाडी लावण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी तीन तरूणांसह एका महिलेला मारहाण केल्याचा प्रकार तालुक्यातील कासारवेली पारवाडी येथे घडला. या सर्वांना लोखंडी रॉडनेही दोघांना मारहाण करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २५ जुलैरोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार मंदार केशव पालशेतकर , रा. बौध्दवाडी पारवाडी कासारवेली यांनी प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार फिर्यादी यांचा भाऊ दिनेश पालशेतकर हा आपली गाडी अनिकेत आपटे यांच्या पानशॉपजवळ उभी करीत होता. त्यावेळी तेथील जयदिप कृष्णा लाकडे याने त्याला याठिकाणी गाडी लावू नको असे सांगत त्याला ढकलून दिले. यावेळी मंदार पालशेतकर वाद सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी जयदिप लाकडे यांचे मित्र सिध्दार्थ रघुनाथ लाकडे, प्रकाश अडुरकर व कृष्णा लाकडे यांनीही दोघांना मारहाण केली. त्यावेळी मंदार पालशेतकर यांनी आपला भाऊ मयुरेश यांना फोनवरुन हा प्रकार सांगितला. यावेळी मयुरेश व त्यांची पत्नी दिशा यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही या चौघांनी हाताच्या थापटाने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दखल केला .
www.konkantoday.com