राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा

कोल्हापुरातील कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. हसन मुश्रीफ यांचे घर आणि साखर कारखाने या ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. त्यांच्या साडूच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारला आहे. तसेच पुण्यात त्यांच्या मुलाचे घर आहे त्या ठिकाणीही आयकर विभागाने छापा मारला आहे.३०-४० जणांच्या प्राप्तिकर विभागाच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. सांगली, सोलापूर,सातारा,ठाणे जिल्ह्यातील वाहनातून पथक आले आहे. स्थानिक बंदूकधारी पोलीस , महिला पोलीस, स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने तेथे बंदोबस्त करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button