
पावसाळी धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण मात्र सुविधांचा आभाव
रत्नागिरी ः जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या धबधब्यांना पावसाळ्यात मोहक स्वरूप येते. निसर्गाच्या या आविष्काराचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येत असतात. जिल्ह्यातील अनेक भागात प्रसिद्ध धबधबे आहेत. एकीकडे शासनाकडून कोकणातील पर्यटन विकासबाबत घोषणा केल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी पर्यटनस्थळापर्यंत जाण्यासाठी रस्ते, लाईट, स्वच्छतागृहे व अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. जर पावसाळी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटन सुरू झाले तर त्या ठिकाणी स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगारही उपलब्ध होवू शकतो. परंतु पर्यटकांची येण्याची तयारी असूनही आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने पर्यटक कोकणातील धबधब्यांकडे जाण्यास इच्छूक नाहीत.
www.konkantoday.com