जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच यांचा शिर्डी वारीचा खर्च शासन करणार
रत्नागिरी ः शासनाच्यावतीने सरपंच परिषदेचे शिर्डी येथे आयोजन करण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच यांना शिर्डी येथे नेण्यात येणार आहे. या शिर्डी वारीचा खर्च शासन करणार आहे. गावातील सरपंच व उपसरपंच प्रशिक्षित असतील तर गावातील विविध योजनांचा ते लाभ घेवू शकतात व गावाचा विकास करू शकतात. यासाठी शासन अनेकवेळा जिल्ह्यात सरपंचांच्या कार्यशाळा घेतात. मात्र त्याला अनेक सरपंच दांडी मारतात. यामुळे अनेक शासनाच्या योजनांना खीळ बसते. आता शासनाने शिर्डी येथे सरपंच परिषद बोलाविली असून या परिषदेला जाण्याचा खर्च शासन करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ सरपंच व उपसरपंच यांनी या विकास कामासाठी होणार्या सरपंच परिषदेसाठी शिर्डीला यावे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
www.konkantoday.com