
आंबोली दरोडा प्रकरणी गोवा पोलिसाला अटक
सावंतवाडी -गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या औषध व्यापारी उमेश पिसे याला आंबोलीजवळ थांबवून त्याचे अपहरण करून त्याच्या जवळील दोन लाखाची रोकड व दागिने लुटण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. बुधवारी या प्रकरणी गोवा येथील पोलिस कर्मचारी निलेश नंदकुमार नाईक, रा.कासारपाल डिचोली गोवा याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान गुरूवारी सकाळी त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली आहे.
www.konkantoday.com