मुसळधार पावसाने जिल्ह्यात काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत
गेले चार दिवस जिल्ह्यात विविध भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होत आहे रत्नागिरी शहर परिसरालाही दोन दिवसांपासून पावसाने झोडपले असून गणपतीपुळे नेवरे भागातही पावसाने जोर केल्याने पाणी तुंबल्याचे प्रकार घडले गणपतीपुळे परिसरातही अनेक ठिकाणी या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली गणपतीपुळे देवस्थानच्या प्रदक्षिणा मार्गाचे संरक्षण भिंत खचून कोसळली सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र यामुळे देवस्थानचे लाखो रुपयांचे नुकसान झाले एकीकडे समुद्राच्या अतिक्रमणामुळे गणपती मंदिराच्या कुंपणाला ही दरवर्षी धोका होत असतो
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत राजापूर खरावते भागात याचा फटका बसला आहे तर काही भागात दरडी खाली आल्याने व काही ठिकाणी रस्ते असल्याने छोटे मोठे मार्ग बंद पडल्या आहेत काल उशिरा खेड दापोली मार्गही माती रस्त्यावर आल्याने बंद झाला मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी खाली येण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत दरडी बाजूला करून वाहतूक सुरू केली जात आहे परंतु परत तेच प्रकार घडत आहेत काल देखील परशुराम घाटात दरड व माती खाली आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती जिल्ह्यातील रत्नागिरी राजापूर खेड संगमेश्वर चिपळूण दापोली आदि भागाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्यातच मुंबई वेधशाळेने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
www.konkantoday.com