
नेत्रावती आणि मत्स्त्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा मिळावा या मागणीसाठी एक मे रोजी करण्यात येणारे आंदोलन कराेनामुळे सध्या स्थगित
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात दररोज ३ लाख हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. तर, ५०० हून अधिक जणाचा रोज मृत्यू होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे तसेच आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सहकार्याची भूमीका आणि सुरक्षेच्या दृष्टीने नेत्रावती आणि मत्स्त्यगंधा एक्रसप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी १ मे, २०२१ ला होणारे उपोषण काहीकाळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिस्थिती निवळल्यानंतर उपोषण ची पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र, आमचा याप्रकरणात पाठपुरावा सुरू असणार आहे. असे निसर्गरम्य चिपळून आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि त्याच्या सहकारी यांनी सांगितले.
www.konkantoday.com