चालकाचा ताबा सुटल्याने शिवाजीनगर पुलावरून कार खाली गेली

0
426

रत्नागिरी ः दोन दिवसांपूर्वी जयस्तंभ येथे भरधाव कारने डिव्हायडरला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर आज पहाटे आयटीआय शिवाजीनगर लिंकरोडने शिवाजीनगरकडे जाणार्‍या कार चालकाचा ताबा सुटल्याने कार शिवाजीनगर पुलाचे रेलींग तोडून खाली गेली. सुदैवाने यात चालकाला कोणतीही इजा झाली नसली तरी गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. शेवरोलेट युवा कंपनीची गाडी घेवून चालक पहाटे आयटीआय शिवाजीनगर लींकरोडने येत असता शिवाजीनगर येथील वळणावर त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार न वळता समोरचे रेलींग तोडून खाली गेली व हा अपघात पहाटे ४ वाजता घडला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here