काजू बी प्रक्रियेपासून काजूच्या टरफलांपासून तेल काढण्याचा ऋषिकेश परांजपे यांचा यशस्वी उद्योग
रत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडीसीमध्ये काजू बी प्रक्रियेवर प्रक्रिया करून काजू उद्योगामध्ये क्रांती करणार्या ऋषिकेश परांजपे यांनी काजू प्रक्रियेबरोबरच काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचा उद्योगही यशस्वी केला असून त्यांच्या या तेलाला विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
परांजपे कॅश्यु या उद्योगाच्यावतीने रत्नागिरी एमआयडीसीमध्ये दरदिवशी तीन टन काजू बी प्रक्रिया केली जात असून या काजूला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. काजू बीवर प्रक्रिया केल्यानंतर उरलेली टरफले पूर्वी गोवा येथे विक्रीसाठी पाठवण्यात येत होती परंतु ते करताना वाहतुकीवर मोठा खर्च होत असल्याने या टरफलाचा उपयोग येथेच कसा करता येईल याचा विचार परांजपे यांनी केला आणि त्यांनी या टरफलांपासून तेल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि आता ते दर महिन्याला १५० टन याप्रमाणे वर्षाला अंदाजे दीड हजार तेलाची निर्मिती करतात. काजूच्या टफरलाच्या तेलाचा उपयोग वेगवेगळ्या उद्योगात केला जातो. याशिवाय इमारती लाकूड, जहाजे यासाठी तेलाचा वापर होत असतो. हे तेल लावल्यामुळे वाळवी व किडीपासून लागडाचे संरक्षण होत असल्याने या तेलाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या टरफलाचे तेल काढल्यानंतरही जो चोथा उरला जातो त्यालाही मागणी असल्याने त्याचाही वापर होत आहे. परांजपे यांनी रत्नागिरीसारख्या केलेल्या भागात यशस्वीरित्या केलेल्या उद्योगामुळे रत्नागिरीतील अन्य तरूणांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे.
www.konkantoday.com