रूपेश सावंत यांचा कार्यकर्त्यांसह मनसेत पुनर्प्रवेश
रत्नागिरी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले रत्नागिरी मनसेचे माजी शहर अध्यक्ष रूपेश सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये पुनर्प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पुनर्प्रवेश झाला. मनसेमधील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोन दिवसांपूर्वी सावंत यांच्यासह अनंत शिंदे, सतिश राणे, नागवेकर आदी सहकार्यांनी ठाकरे यांची भेट घेवून मनसेमध्ये येण्याची भूमिका जाहीर केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष जितू शिंदे व व शहर अध्यक्ष अरविंद मालाडकर उपस्थित होते. यावेळी सर्वांना पुन्हा जोराने कामाला लागा अशा सूचना मा. ठाकरे यांनी दिल्या. सावंत यांची उपजिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com