
रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकवर्गाची कसरत, वार्षिक परीक्षा की निवडणुकीचे प्रशिक्षण?
रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकवर्गात सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेली पहिली ते आठवी या वर्गाची नियतकालिक मूल्यांकन (पॅट) या परीक्षेच्या तारखांच्या दरम्यानच जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून शाळेतील शिक्षकांचे निवडणुकीचे प्रशिक्षण लावण्यात आले आहे. त्यामुळे नक्की राज्य शासनाचे आदेश पाळावेत की जिल्हा प्रशासनाचे याबाबत तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. www.konkantoday.com