
चिपळूण-खेंड परिसरात घरफोडी
चिपळूण ः चिपळूण येथील खेंड गडदेवाडी येथे राहणारे गजानन भागवत यांचे बंद बंगला फोडून चोरीचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला. मात्र चोरट्याच्या हाताला काहीही लागले नाही. भागवत हे आपल्या कुटुंबियांसह अमेरिकेत आपल्या मुलीकडे गेल्यामुळे हा बंगला बंद होता. सकाळी ही घटना शेजार्यांना कळल्यावर त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली.
www.konkantoday.com