म्हाडा तर्फे गिरणी कामगारांना मार्गदर्शन शिबीर संपन्न
आज दि.२० जुलै रोजी रत्नागिरी अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी परिसर रत्नागिरी येथे म्हाडा अध्यक्ष अा.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित गिरणी कामगारांना म्हाडा लॉटरी संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला सुमारे २५० लाभार्थी गिरणी कामगार उपस्थित होते.यावेळी गिरणी कामगार विभाग म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्री.गावित,मुख्य कार्यकारीधिकारी सौ.किरण कासणे,छाननी अधिकारी रविंद कुकडे,श्री.पेडणेकर,आय.टी विभागाप्रमुख कु.गीतांजली कांबळे आदी म्हाडाचे अधिकारी उपस्थित राहून गिरणी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांनी उपस्थित राहून गिरणी कामगारांना संबोधीत केले.
www.konkantoday.com