महावितरण कडून  रोजगाराची संधी

0
796

महावितरणची नवीन वॉलेट सुविधा.वीज ग्राहकांना बँका, पोस्ट कार्यालयात जाऊन वीजबिल भरण्याची आता गरज नाही महावितरण वॉलेटद्वारे वीज भरणा करण्याची संधी.छोटे उद्योजक, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकान व वीजबिल स्वीकारणाऱ्या एजन्सीजना वीज देयकांची वसुली करून कमिशनद्वारे उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे .कोणत्याही अठरा वर्षांवरील व्यक्तींना महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येइल. वॉलेट धारकाने प्रथम किमान पाच हजारांचे रिचार्ज करणे गरजेचा आहे त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल.वॉलेट धारकाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने वॉलेट रिचार्ज करता येऊ शकते.वॉलेट रिचार्ज केल्यावर वॉलेट धारक अॅपमध्ये नोंदणी घेऊन महावितरणच्या ग्राहकांकडून वीज देयकांची वसुली करू शकतात.वीज देयक वसुली केवळ रोख रकमेद्वारेच करता येईल.वीज दक्ष विकृत केल्यावर महावितरणद्वारे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस दिला जाईल.त्यामुळे या रोजगाराच्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here