देवरुख – रत्नागिरी मार्गावरील पांगरी घाट धोकादायक स्थितीत
देवरुख – रत्नागिरी मार्गावरील पांगरी घाट सध्या वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेली खोदाई घाटाच्या मुळावर येण्याची शक्यता आहे.
घाटात दोन ठिकाणी दरडी आणि चिखल माती रस्त्यावर आली आहे. जिओच्या केबल खोदाईने एक मोरी खचली आहे. बाजुपट्टिही दुभंगली आहे.
घाटात डोंगरावर सुरु असलेल्या खोदकामाचा रस्त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . मुसळधार पावसात हा रस्ता अधिकच धोकादायक होण्याची चिन्हे आहेत.
www.konkantoday.com