खोतीत अडकलेल्या श्रीराम मंदिराची खोतीतून मुक्तता
रत्नागिरी ः आरे येथील श्रीराम मंदिराच्या जागेची खोती असलेल्या व्यक्तीने देवस्थानविरूद्ध मालकीचा दावा धर्मादाय सहआयुक्तांकडे केला होता. या दाव्याचा निकाल नुकताच धर्मादाय आयुक्तांनी देताना सांगितले की, देवस्थान हे कोणत्याही खाजगी व्यक्तीचे नसून त्याची झालेली नोंद ही योग्यच आहे. या निकालामुळे खोताकडून ताब्यात ठेवलेली जागा व मालमत्ता देवस्थानच्या ताब्यात देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. २००३ मध्ये कोर्टाकडून श्रीराम मंदिर देवस्थान नोंदणीविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दावा करण्यात आला होता.
मंदिर हे सार्वजनिक देवस्थान आहे, त्याची नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी महेश भोसले यांनी देवस्थान नावाने आयुक्तांकडे नोंदणी केली. सार्वजनिक देवस्थान म्हणून नोंद झाली.
अधिक माहिती अशी की, देवस्थानच्या नोंदणीनंतर पुर्वापार देखभाल व दुरूस्तीचे काम करणार्या व ज्यांच्या हातात आजपर्यंत या देवस्थानची खोती होती त्या खाजगी व्यक्तींनी देवस्थानची जागा आपल्या नावावर असून झालेली नोंदणी ही चुकीची आहे. आजपर्यंत देवस्थानची सर्व मालमत्ता आमच्याकडे असल्याचेही त्यांनी उल्लेख करत श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या विरोधात धर्मादाय आयुक्त कोल्हापूर येथे २०१७ मध्ये दावा दाखल केला होता. गेली दोन वर्ष या दाव्याची सुनावणी केली जात होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर यांनी दाव्यासाठी अतिलात गेलेल्यांचा दावा चुकीचा ठरविला असून देवस्थानची जागा ही तातडीने श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नावे करण्याचा निकाल दिला. अतिलात गेलेले दशरथ भोसले यांच्यासह १२ जणांनी केलेला दावा हा पूर्ण चुकीचा असल्याचा निर्णय देण्यात आला. आरे येथे देवस्थानच्या जागेला वारसाहक्क लागत नाही. यामुळे देवस्थानच्या जागेला लावलेला वहिवाटदार व मालक म्हणून अधिकार बजावू शकत नाही. परंतु अपिलात गेलेल्या दशरथ भोसले यांच्यासह इतर बाराजणांनी देवस्थानच्या जागेपैकी काही जागा दुसर्याच व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे. परिणामी धर्मादाय सह आयुक्तांनी ते सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आदेश देत मा. तहसिदार यांनी तातडीने नावे कमी करून सातबारा केवळ श्रीराम मंदिर देवस्थानच्या नावे ठेवण्याचा निकाल दिला.
www.konkantoday.com