
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आमचा गाव आमचा विकास सुरु
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आमचा गाव आमचा विकास चा उपक्रम शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी हा उपक्रम आहे.रत्नागिरी जिल्ह्यातही याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षाचे ग्रामपंचायत विकास आराखडे लोकसहभाग नियोजन प्रक्रिया राबवून तयार केलेले आहेत.ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये शासनाच्या विविध विभागामार्फत त्या ग्रामपंचायतींमध्ये हाती घेतलेल्या व घेण्यात येणार्या योजनांची माहिती त्या त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून द्यायचे आहे.
www.konkantoday.com