
खेड तालुक्यात पर्जन्यवृष्टीने लाखोंचे नुकसान
खेड तालुक्यामध्ये पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील सूत्रांकडून प्राप्त होत आहे.सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमवार दिनांक १५ जुलै रोजी तालुक्यातील कोंडिवली बौद्धवाडी येथील बाबा राम कांबळे यांच्या घराचे ५८२०० रुपयांचे नुकसान झाले आहे व त्यांची पत्नी साै. जोत्स्ना व नात दीक्षा या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.तसेच तालुक्यातील पंधरागाव विभागातील चोरवणे येथील सुवर्णा शिंदे यांच्यातू दाेन घरांचे मिळून १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात आतापर्यंत १५२१.६८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com