
एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणातील ८२ भूखंडधारक पात्र ठरले
रत्नागिरी एमआयडीसीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ९७ भूखंडाचे उद्योजकांना वाटप केले होते .मात्र हे वाटप करताना संबंधित अधिकाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीत त्याला मान्यता न घेताच वाटप केले होते. यामुळे या प्रकरणात या अधिकाऱ्यांमार्फत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप झाला होता .त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. याप्रकरणी उद्योजकांनी पैसे भरल्यामुळे ते अडचणीत आले होते. या सर्व प्रकारात उद्योजकांचा काहीच दोष नसल्याने त्यांना भूखंड मिळावेत अशी सर्व लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती .शेवटी या प्रकरणात एमआयडीसीने ८२ भूखंडधारक पात्र ठरवले त्यापैकी आठ जणांना आता भूखंड देण्यात आला आहे.