
खेड पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी भीतीच्या छायेखाली
खेड ः सतत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाव घेणारे पोलीस कर्मचार्यांच्या निवास व्यवस्थेबाबत अनास्था असून खेड येथील पोलीस कर्मचार्यांच्या वसाहतीची दैनावस्था झाली असून ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या वसाहतीची अवस्था जीर्ण झाली आहे. या वसाहतीत २० खोल्या असून पावसाळ्यात या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होते. तरीदेखील कर्मचार्यांना दुसरी सुविधा नसल्याने भीतीच्या छायेखाली हे कर्मचारी या ठिकाणी रहात आहेत.