काजू व्यावसायिकांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे अर्थमंत्री सुनिल मुनगंटीवार यांचे आश्वासन
रत्नागिरी ः कोकणातील काजू व्यवसाय संकटात असून या व्यवसायाला उभारणी देण्यासाठी शासनाने १०० कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक असल्यास ५०० कोटी रु. जरी लागले तरी ते उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन अर्थमंत्री सुनिल मुनगुंटीवार व वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काजू व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिली. रत्नागिरी कृषि प्रक्र्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत विचारे यांच्यासह एका शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.