
फिनोलेक्स ऍकॅडमीला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
रत्नागिरी ः रत्नागिरीच्या फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये द असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियातर्फे देण्यात येणारा नॅशनल एज्युकेशन शाईन एक्सलन्स ऍवॉर्ड, एडटेक या संस्थेचा बेस्ट इंडस्ट्री ऍकॅडमीया इन्स्टै्रस ऍवॉर्ड, नो पेपर फार्म यांचे इंडियन एज्युकेशन ऍवॉर्ड, माइंड मिंगले या संस्थेचा उत्कृष्ट उच्चशिक्षण राष्ट्रीय पुरस्कार व कम्युनिकेशन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे भारतातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे