
अन्ननलिकेत अडकलेली दाताची कवळी काढण्यात,डेरवण येथील वालावलकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांना यश.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील ४६ वर्षीय व्यक्तीने गेल्या ४ दिवसांपूर्वी दाताची कवळी गिळली. हा रुग्ण गोळी घेत होता. गोळी घेतल्यावर त्याने पाणी प्यायल्यानंतर दाताची कवळी निघून ती पोटात गेली. यामुळे या रुग्णाच्या पोटात दुखू लागले. पोट दुखीचा त्रास असह्य झाल्याने या रुग्णाने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली असता येथील डॉक्टरांनी तपासण्या करून निष्कर्षअंती ऑपरेशनद्वारे पोटात अडकलेली ही कवळी काढण्यात डॉक्टरांना यश आले असून या रुग्णाला दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. याबद्दल रुग्णाच्या कुटूंबियांनी डेरवण वालावलकर रुग्णालयाला धन्यवाद दिले आहेत. सावर्डे येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीने कवळी बसवली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पाणी पिताना ती कवळी पोटात गेली. नंतर हळूहळू त्यांच्या पोटात दुखू लागले. केळी खाल्ल्यावर थोडेसे बरे वाटू लागले. मात्र, दुखणे थांबत नव्हते. अखेर या रुग्णाने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. यावेळी गेस्टॉरंटॉलॉजिस्ट डॉ. जोशी यांनी एक्स-रे काढण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार अन्ननलिकेत अडकलेली कवळी पुढे पोटात सरकली असल्याचे एक्सरेत दिसून आले. दोन दिवसांनी जेव्हा परत या रुग्णाने डॉ. जोशी यांना दाखवले असता असे दाताची कवळी पोटातच अडकली असल्याचे लक्षात आले यामुळे अधिक उपचारासाठी या रुग्णाला सिटी स्कॅन करण्यास सांगितले. जेणेकरून कवळी कुठे अडकली आहे हे लक्षात आल्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी करून काढणे सोपे होईल. यामुळे गॅस्ट्रोस्कोपी करून पोटातून बाहेर काढून दाताची कवळी अन्ननलीकेपर्यंत आणून ठेवली व डॉ. जोशींच्या असे निदर्शनास आले की कवळी अन्ननलिकेतून काढण्यासाठी दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याची गरज आहे. त्या कवळीमुळे अन्ननलीका फाटू शकते. क्षणाचाही विलंब न करता डॉ. जोशी यांनी ई. एन्. टी. विभागाचे डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांच्याशी चर्चा करून लगेच रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेतले. डॉ. राजीव केणी यांनी दुर्बीणीद्वारे कुठेही चिरफाड न करता दाताची कवळी अखेर सुरक्षितपणे बाहेर काढली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रतीक शहाणे यांनी मदत केली. तर डॉ. लीना, डॉ. अस्मीता, डॉ. रेवती व डॉ. ऋषभ यांनी भूल देऊन साथ दिली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्णासह नातेवाईकांनी डॉ. राजीव केणी, डॉ. प्रतीक शहाणे व डॉ. आनंद जोशी यांचे आभार मानले.