
सिंधुदुर्गातून गोव्यात जाणारे २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ टोळीतील सक्रीय संशयित आरोपीला अटक
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथून गोव्यात अमली पदार्थांची वाहतूक करताना गोवा राज्य अमली पदार्थाविरोधी कक्षाच्या पोलिसांनी पत्रादेवी पोलीस तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली. या प्रकरणी परवेज अली खान (३०, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल २५ लाख १० हजार रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.या कारवाईमुळे सिंधुदुर्गचे गोव्याशी असलेले ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. बोगस ग्राहकांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्गातून गोव्यात अमली पदार्थांची वाहतूक करतानाची ही पहिलीच कारवाई आहे. मात्र यामुळे सिंधुुदर्ग पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताब्यात घेण्यात आलेला संशयित परवेश हा आंतरराज्य अंमली पदार्थ टोळीत सक्रीय असून तो गोवा व मुंबईतील बड्या पार्ट्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती गोवा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे.गोव्यात सध्या सलग सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे परवेज हा कुडाळ येथून गोवा राज्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची गोपनीय माहिती गोवा अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलीस पथकाला मिळाली होती.
त्यानुसार सिंधुुदुर्ग-गोवा सीमेवर महामार्गावर पत्रादेवी पोलीस तपासणी नाका येथे पथकाने सापळा रचला होता.रविवारी सकाळी पत्रादेवी तपासणी नाक्यावर संशयित परवेज याला अमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २०८ ग्रॅम एक्सटसी पावडर व ४३ उच्च दर्जाच्या एक्सटसी गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २५ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली.www.konkantoday.com