जिल्ह्यातील विश्वस्तांची कार्यशाळा रत्नागिरीत गुरुवारी तर चिपळूणमध्ये शुक्रवारी
रत्नागिरी, दि.24 : जिल्ह्यातील सर्व संस्था आणि त्यांचे विश्वस्त यांच्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता येथील दैवज्ञ भवन नाचणे रोड येथे विश्वस्तांची कार्यशाळा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व संस्था आणि त्यांचे विश्वस्त यांच्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता यावेळेत चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे विश्वस्तांची कार्यशाळा होणार आहे.
रत्नागिरी येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून वकील एस बी शहाणे, संनदी लेखापाल आनंद एम पंडित, कर सल्लागार धनेश रायकर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेसाठी संस्था नोंदणी बाबत मार्गदर्शन, न्यास / संस्था बदल अर्ज कलम 22, न्यासाचे हिशोबपत्र, न्यासाचे ठेवायचे अभिलेखा, निरीक्षक चौकशी अहवाल/ कलम 37,41अ,41ब, 41ड,50अ., न्यासावर विश्वस्त नेमणुकी बाबतचे कलम 47, न्यासाची स्थावर मिळकत विक्री कर्ज भाडेकरार हस्तांतरण बाबतचे कायदेशीर प्रक्रिया इत्यादी, धर्मादाय रुग्णालय व त्याबाबत मानवी उच्च न्यायालय मुंबई यांची योजना याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त एन एस सय्यद तसेच संस्थानचे डॉ. एस.व्ही.केळकर यांनी आयोजन केले असून, या कार्यशाळेचा जास्तीत जास्त विश्वस्तांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी एस एच चक्के 8208771286, एम जी ठसाळे 9763485852 यांच्याशी संपर्क करावा.*
चिपळूण येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य वाय वाय खाडीलकर,वकील एस.बी.शहाणे, सनदी लेखापाल एस.एस.करमरकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेसाठी संस्था नोंदणी बाबत मार्गदर्शन, न्यास / संस्था बदल अर्ज कलम 22, न्यासाचे हिशोबपत्र, न्यासाचे ठेवायचे अभिलेखा, निरीक्षक चौकशी अहवाल/ कलम 37,41अ,41ब, 41ड,50अ., न्यासावर विश्वस्त नेमणुकी बाबतचे कलम 47, न्यासाची स्थावर मिळकत विक्री कर्ज भाडेकरार हस्तांतरण बाबतचे कायदेशीर प्रक्रिया इत्यादी, धर्मादाय रुग्णालय व त्याबाबत मानवी उच्च न्यायालय मुंबई यांची योजना याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त एन एस सय्यद तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदीर अध्यक्ष यतीन जाधव यांनी आयोजन केले असून या कार्यशाळेचा जास्तीत जास्त विश्वस्तांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी एस एच चक्के 8208771286, एम जी ठसाळे 9763485852 यांच्याशी संपर्क करावा.000