
चिपळूणमध्ये प्लॅस्टिक अंडी मिळाल्याच्या वृत्ताने खळबळ
चिपळूणमधील एका प्रसिद्ध व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेली अंडी प्लॅस्टिकची निघाल्याची तक्रार पत्रकार सुशांत कांबळे यांनी केली आहे खरेदी केलेली अंडी घरी आणल्यानंतर उकडण्यास ठेवली असता ती व्यवस्थित शिजत नसल्याचे लक्षात आल्यावर पाहणी केली असता अंड्याच्या वरचा थर व आतील पिवळा बलक संशयास्पद प्लास्टिक सारखा असल्याचे दिसून आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे याबाबत कांबळी हे अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार करणार आहेत याबाबत अन्न प्रशासन विभागानेही तातडीने दखल घेऊन खरा प्रकार काय आहे याचा खुलासा करणे गरजेचे आहे यापूर्वी सांगलीतही प्लास्टिकची अंडी मिळाल्याची तक्रार झाली होती