देशाची लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घटली
रत्नागिरी ः देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रत्नागिरी जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरत आहे. २००१ ते २०११ ची आकडेवारी पाहता रत्नागिरी जिल्ह्यात ८१ हजाराने लोकसंख्येत घट झाली आहे. ही लोकसंख्या घटण्याची कारणे नेमकी काय आहेत हे पाहणे गरजेचे आहे.
कुटुंबनियोजनासारख्या कार्यक्रमात दोन अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहे. तर महाराष्ट्राचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याचा जन्मदर ११.६० टक्के आहे. तर मृत्यूदर ७.९० टक्के तर माता मृत्यू दर ०.२९ व अर्भक मृत्यूचे प्रमाण ७.४० तर बालमृत्यूचे प्रमाण ०.१० आहे.
मोठ्या शहरात स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घटत आहे. ग्रामीण भागातील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबईसारख्या शहरात स्थलांतर करीत आहेत. याचा परिणाम जिल्ह्यातील लोकसंख्येवर झाला आहे.