भैरीबुवाच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा ११ व २७ जुलैला
रत्नागिरी ः ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव बळ कार्यक्रम जाहीर झाला असून पहिली ग्रामप्रदक्षिणा ११ जुलै व दुसरी २७ जुलै रोजी होणार आहे. सकाळी १० वा. श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार असून ती खालची आळी, कॉंग्रेस भवन, टिळक आळी, झाडगांव येथे पटवर्धन व सावंत (खोत) यांचेकडे थांबेल. त्यानंतर जोशी पाळंदमार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांचेकडे थांबेल तर फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंडमधील सहाणेवर थांबेल, १८ हाताच्या गणपती मंदिरामार्गे गाडीतळ, गोखले नाका, मारूती आळी, तेलीआळी येथील कोतवडेकर सहाणेवर थांबेल, त्यानंतर मारूती आळी, पर्याची आळी, धमालीच्या पारावरून विठ्ठलमंदिर मार्गे मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे रात्रौ १० वा. पालखी भैरी मंदिरात येईल व गार्हाणे होवून ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रम संपेल.
१४ जुलैला दु. १२ वा. भैरीची बळ बाहेर पडणार आहे. १२ वाड्यातील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ, भाविक यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भैरी देवस्थान विश्वस्तांतर्फे अध्यक्षांनी केले आहे.