
किनारपट्टीवर हायटाईडमुळे काळबादेवी किनार्याला फटका
रत्नागिरी ः रत्नागिरी परिसरात काही दिवस मोठ्या प्रमाणावर पडणार्या पाऊस व वार्यामुळे समुद्र खवळला असून समुद्राला उधाण आले आहे. या हायटाईडचा फटका मिर्या भागाप्रमाणे काळबादेवी भागालाही बसला आहे. समुद्राच्या लाटांमुळे काळबादेवी किनार्याची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धूप होत असून आता यावर्षी उधाणामुळे किनार्याची मोठी धूप झाली आहे. त्यामुळे पारकरवाडी, शेट्येवाडी, बिर्जेवाडी या भागाला भीती निर्माण झाली असून किनारपट्टीनजिकच्या नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.