नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, जामीन फेटाळला
कणकवली दि.०५- मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूंनी या प्रकरणावर वकिलांनी युक्तिवाद केला, अखेर न्यायालयानं नितेश राणेंना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कणकवली बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.