आमदार सदानंद चव्हाणांवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करा ः माजी खासदार निलेश राणे यांचा आक्रमक पवित्रा
रत्नागिरी ः सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई केली जाते मग २३ बळी घेतलेल्या तिवरे धरण प्रकरणी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह अधिकार्यांवर ३०२ खाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून कारवाईची मागणी करणार आहोत. या धरणाचे बांधकाम चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले होते. १०० वर्षांचे आयुष्य असणारे हे धरण १४ वर्षात फुटले कसे? तसेच धरणाचा ४ कोटींचा खर्च १४ कोटींवर कसा गेला असा सवाला राणे यांनी विचारून हे काम बोगस झाल्याचा आरोप केला आहे.
खेकड्यांनी धरण फोडले असे विधान करणार्यांना चपलांचा हार घालावासा वाटतो. अशी विधाने करून जनतेच्या जखमांवर मीठ चोळले जात आहे असेही राणे म्हणाले.