
घराजवळील पालापाचोळा पेटवताना दापोली येथील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
दापोली :-* दापोली तालुक्यातील भोपण साहिल वाडा येथील निजामुद्दीन बाला पावणे वय ८५ हे आपल्या घराशेजारी असलेला पालापाचोळा जाळत होते. त्यांच्या पुढ्यात असलेल्या पालापाचोळ्याने अचानक पेट घेतल्याने निजामुद्दीन पावणे हे ही आग विझवण्यासाठी गेले. त्या वेळेला पालापाचोळ्याचा भडका होऊन त्यातच पावणे तोल जाऊन पडल्यामुळे होरपळून गेले होते. पुढील उपचारासाठी दापोली येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत म्हणून घोषित केला आहे.निजामुद्दीन बाला पावणे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.