अभियंत्याला पुलाला बांधून आंदोलन करणार्या मनसे नेत्यांवर गुन्हा दाखल
खेड ः खेडमधील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नव्या पुलाचा भराव खचल्यानंतर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आक्र्रमक झालेल्या व त्यासाठी आंदोलन करणार्या खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व त्यांच्या मनसेतील त्यांच्या सहकार्यांविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंत्यांना पुलाला बांधून जाब विचारण्यात आला होता. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जनतेने कायदा हातात घेवू नये, त्यांचेवर परत कारवाई करण्यात येईल असा इशारा नुकताच दिला होता.