दापोली मतदारसंघावर दावा करून भाजपचा शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न?
दापोली ः दापोली विधानसभा मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मिळावी अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करण्यात आली आहे. हा मतदारसंघ सध्या युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असून आता या मतदारसंघातून रामदास कदम यांचे चिरंजीव निवडणूक लढविण्यास इच्छूक असून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात असतानाच आता भाजपने या ठिकाणी लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने भाजप शिवसेनेला शह देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे व तालुकाध्यक्ष भाऊ इदाते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपची भूमिका स्पष्ट केली. युतीकडून भाजपलाच हा मतदारसंघ मिळावा अशी मागणी दापोली, खेड, मंडणगड भागातून भाजप कार्यकर्त्यांनी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.