जिल्ह्यात अवकाळी पावसाने 62 लाखांचे नुकसान; आंबा, कलिंगड, काजू पिकाची हानी

रत्नागिरी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक चिपळूण व संगमेश्‍वर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला असून सुमारे 991हून अधिक शेतकर्‍यांचे चारशे हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. आंबा बागायतीचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. एकूण सुमारे 62 लाख 81 हजारांचे नुकसान जिल्ह्यात झाले आहे. वार्‍यासह पडलेल्या गारांच्या अवकाळी पावसाने दोन तालुक्यात 392 हेक्टरवरील आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल काजू बागायतीचे 11.5 हेक्टरवर नुकसान झाले आहे. केळी बागायतीलाही या अवकाळीचा फटका बसला आहे. भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: कलिंगडाचे मोठे नुकसान नोंदवण्यात आले आहे. संगमेश्‍वरमध्ये 688 तर चिपळूणमध्ये 303 अशा 991 शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे आतापर्यंत करण्यात आले आहेत. दापोलीत 4, खेड 11, गुहागर 17, चिपळूण 112, संगमेश्‍वर 142 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर गुहागरमध्ये 1, चिपळूण 4 तर संगमेश्‍वरमध्ये 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचे सुमारे 58 लाखाहून अधिक रुपयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्‍त तीन शाळा, पोल्ट्री फार्म, शौचालय, मंदिर, दुकान, आरोग्य केंद्र यांनाही या अवकाळीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे अद्यापपयर्र्त पंचनामे सुरु असल्याने शेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही याकडे शेतकरी व नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत काय भूमिका घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button