एमटीडीसीचा ढिसाळ कारभार ,तीन कोटींच्या हाऊसबोटी सडून जाणार ?
कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना आकर्षण निर्माण करण्यासाठी आणलेल्या दोन हाऊसबोटी दुरुस्तीसाठी दाभोळ बंदरात आणल्या आहेत या बोटीवरील दुरुस्तीचा खर्च कसा करायचा याबाबत अधिकारी निर्णय घेत नसल्याने या बोटी सडून जाण्याची शक्यता आहे पंचगंगा आणि कोयना या नावाच्या या हाऊसबोटी दुरुस्तीसाठी दाभोळ बंदरात सुवर्णदुर्ग कंपनीकडे आणण्यात आल्या होत्या सुवर्ण कंपनीने त्यावर काही लाख रुपये खर्च करून दुरुस्ती केली परंतु त्यावर आणखी दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणण्यात आले होते परंतु त्याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने या बोटी समुद्रात सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत एसटीचे अधिकारी कोणताच निर्णय घेत नसल्याने या बोटींची राखण करण्याचे काम सुवर्णदुर्ग कंपनीला करावे लागत आहे याबाबत सुवर्णदुर्ग कंपनी कोर्टात जाण्याच्या विचारात आहे