ॲड. मिलिंद साठे यांना ‘लोटिस्मा’चा “अपरांतरत्न” पुरस्कार


महाराष्ट्र शासनाचे, कोकणातील पहिले महाधिवक्ता ठरलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शनिवारी गौरव सोहळा

चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने दिला जाणारा ‘लोटिस्मा’चा “अपरांतरत्न” पुरस्कार, महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेल्या ॲड. मिलिंद साठे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या शनिवारी (दि. २७) समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

विशेष म्हणजे हा सन्मान लाभलेले मिलिंद साठे हे अपरांतभूमीतील पहिले व्यक्तिमत्त्व आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब परुळेकर यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान चिपळूणच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे भूषविणार आहेत. या अभिमान सोहळ्याप्रसंगी ज्या व्यक्ती आणि संस्था यांना ॲड. मिलिंद साठे यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०६७३७५७३८ येथे संपर्क साधावा.

या विशेष समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’ वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button