
१०८ रुग्णवाहिका ठरली जीवदानाचा देवदूत, २४,०१६ रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत
जीवन-मरणाच्या टोकावर उभ्या असलेल्या अनेकांसाठी ’१०८ रुग्णवाहिका सेवा’ ही अक्षरशः देवदूत ठरली आहे. गेल्या वर्षभरात विविध आपत्कालीन पारेस्थितीमध्ये २४,०१६ रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत दिली असून, यात गंभीर अवस्थेतील अनेकांचे प्राण वाचवण्यात या सेवेची मोलाची भूमिका राहिली आहे.
ग्रामीण भाग, डोंगराळ परिसर, महामार्गावरील अपघात, प्रसूती आणि हृदयविकारांची तातडी सर्वच ठिकाणी १०८ रुग्णवाहिका समयसूचकतेने धाव घेत असल्याचे चित्र या आकडेवारीतून स्पष्ट होते.
ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची मदत मिळण्यात हा उपक्रम सर्वाधिक उपयोगी ठरल्याचे स्पष्ट होते. विशेषतः प्रस्तीवेळी गर्भवती महिलांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यास या रुग्णवाहिकेची मोठी मदत झाली. प्रसूतीसंबंधित ६२६ प्रकरणे हाताळल्यामुळे या सेवेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
www.konkantoday.com




