मातृभूमीच्या दोन संचालकांना अटक

मोठ मोठ्या रकमेचे आमिष दाखवून रत्नागिरीतील चौदाशे लोकांची फसवणूक करणाऱया मातृभूमीच्या चार संचालकांपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मोठ्या रकमेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील अनेक लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा झाल्यानंतर मातृभूमी या संस्थेच्या संचालकांनी पळ काढला होता .याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यातील दोन संचालक संजय विश्वास व विनोद पटेल यांना गुजरातहुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button