
खेडमध्ये पाणीपट्टी थकवणार्यांच्या नळजोडण्या बंद करण्याची मागणी
खेड नगरपरिषदेच्या पाणी विभागाच्या पथकामार्फत थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या बंद करण्याची मोहीम गेले आठवडाभर कार्यालयीन कामकाजामुळे थांबवण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात तीन थकित पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्याची माहिती दिली.नगरपरिषदेने पाणीपट्टीधारकांना थकित पाणीपट्टी भरण्यासंदर्भात सातत्याने नोटीसा बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पथकाने नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. www.konkantoday.com