रत्नागिरी शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
गेले काही दिवस आतुरतेने वाट पाहणाऱ्या पावसाने आता चांगली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे एक्स पहाटेपासूनच रत्नागिरी शहर परिसरात विजेच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे मुसळधार पावसाने आता काही काळ विश्रांती घेतली असली तरी शहर परिसरातील विद्युत पुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला आहे मुसळधार पावसामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडला असून शहरातील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित केला आहे कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा धिम्यागतीने धावत आहे