मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या गिरणी कामगारांना आता मुंबईबाहेर करण्याचा डाव
सत्ताधाऱयांनी वारंवार आश्वासने देऊनही गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे या खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गिरणी कामगारांना बदलापूर व उरणमध्ये घरे दिली जातील असे सांगितल्याने कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे पूर्वी मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा मोठा वाटा होता गिरणी कामगारांना मुंबईत घरे दिले जातील असे वारंवार आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते आता कामगारांना मुंबईबाहेर नेण्याचा डाव आखला जात आहे सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी १जुलै रोजी गिरणी कामगार कृती संघटनेच्यावतीने वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.