
मुलीच्या आईबापाला मारहाण करून अल्पवयीन मुलीला पळविले
चिपळूणः चिपळूण तालुक्यातील उबळे मधलीवाडी येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेणार्या प्रियकराला मदत करणार्या मुलीच्या आईबापाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत आरोपी संदेश बारे याच्याविरूद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश बारे याने या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेम जुळवत लग्नाचे आमिष दाखवत तिला पळवून नेण्याचे ठरविले. ही घटना आईवडिलांना कळल्यावर त्यांनी त्याला विरोध केला परंतु आरोपीने त्यांना मारहाण करून अल्पवयीन मुलीला घेवून पलायन केले. याबाबत पोलीस दोघांचा शोध घेत आहेत