
खेडमधील पत्रकारांचे बेमुदत उपोषण तुर्तास स्थगित
खेड ः खेडमधील मटकाचालकांच्या विरोधात योग्यती कारवाई न झाल्याने उपोषणासाठी बसलेल्या खेडमधील पत्रकारांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. पत्रकारांच्या उपोषणासंदर्भात राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांच्या मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात तशी पत्रे पत्रकारांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सध्या सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.
पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य करताना त्या १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल असेही आश्वासन पत्रात देण्यात आले आहे. मात्र या प्रकारातील आरोपींना मोक्का लावण्यात यावा व स्थानिक पोलीस निरीक्षकांची बदली व्हावी ही पत्रकारांची मुख्य मागणी मान्य होणार की नाही हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल. दरम्याने जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी अवैध व्यवसाय करणार्यांवर पोलीस कडक कारवाई करतील असे स्पष्ट केले आहे.