
सबकॉन्ट्रॅक्टर नेमतो असे आमिष दाखवून १३ लाख रुपये देवूनही प्रत्यक्षात कोणतेही काम न देता फसवणूक करणार्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी ः पॉवर प्लॅन्टसाठी लागणारे सामाना न पाठविता चिपळूण येथील उद्योजकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीनजणांविरूद्ध चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्ममोचन भास्कर पुहाव (४९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनिल सिंह (७१) पी. गांगुली, प्रिन्स यांनी संगनमत करून के.टी.पी.एस. पॉवर प्लॅन्टचे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचे फिर्यादी पुहान यांना सांगून तुम्ही सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून आमच्या सोबत काम करा, तसेच या कामासाठी लागणारे मटेरियल आपणाला पुरवू असे आश्वासन दिले होते. पॉवर प्लॅन्टसाठी लागणार्या साहित्याची किंमत म्हणून १३ लाख ४१ हजार २४३ रुपये ६० पैसे संबंधितांच्या खात्यात तक्रारदाराने भरले होते.
मात्र सदरचे साहित्य के.टी.पी.एस. पॉवर प्लॅन्ट कंपनी चेलपूर तेलंगणा यांनी आजपर्यंत न पाठविल्याने फिर्यादी पुहान यांची फसवणूक झाली