
रत्नागिरी जिल्ह्यात साथीची लागण कामथेत आढळले ११ डेंग्यूसदृश्य रूग्ण
चिपळूण ः कामथे येथे डेंग्यूसदृश्य आजाराने व मलेरियाच्या साथीने दहशथ माजविली असून आतापर्यंत ११ डेंग्यूसदृश्य, तर चौघांना मलेरियाची लागण झाली आहे.
कामथे जावळेवाडी येथील धीरज राजेश जावळे, राजेश नारायण जावळे, संदीप बाबू खोपडकर, दीपक धोंडू जावळे, बाळा केशव जावळे, सुरज सीताराम घाणेकर, तुकाराम बाळा मालप, चंद्रभागा तुकाराम मालप, सुनिता सोनू घाणेकर, अमोल भागोजी शिगवण, प्रतिक्षा प्रकाश जावळे आदींना डेंग्यूसदृश्य आजार जडला असून त्यापैकी अमोल शिगवण हा रूग्ण आजही येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच वसंत हरी जावळे, शुभांगी शंकर जावळे, सुभद्रा शांताराम उदेग, विलास शांताराम उदेग यांना मलेरियाचा आजार जडला आहे. त्यांनीही लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत. याशिवाय काहींनी कामथे उपजिल्हा रूग्णालय व काहींनी डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात उपचार घेतले आहेत