
कोकण रेल्वे मार्गावर मंगला एक्स्प्रेस १० तास विलंबाने*
*__कोकण मार्गावरून धावणार्या निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचा लेटमार्क अजूनही कायम आहे. सोमवारीही मंगला एक्स्प्रेस तब्बल १० तास विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. या एक्सप्रेस पाठोपाठ अन्य ६ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना मनस्ताप कायम राहिला.www.konkantoday.com