
भाजप-सेना युती फक्त विधानसभेपुरतीच, स्थानिक निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी काढला स्वबळाचा सूर
रत्नागिरी ः राज्यामध्ये असलेले सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत असुन कोकणलाही भरीव निधी सरकारने दिलेला आहे. सेना-भाजपमध्ये झालेली युती ही लोकसभा व विधानसभा निवडणुकांपुरतीच आहे. मागील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेना-भाजपची युती फक्त लोकसभा विधानसभा निवडणुकीपुरतीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-सेना युती नाही. त्यामुळे आम्ही अशा निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभेही करू शकतो व निवडूनही आणू शकतो. भाजपला आता लोकांकडून प्रतिसाद मिळत असून खेडोपाड्यात लोक पक्षाकडे आकर्षित होत आहेत. देवरूखमध्ये आमची सत्ता असून चिपळूणमध्ये आमचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे रत्नागिरीतही आमचा नगराध्यक्ष होऊ शकतो असा दावा त्यांनी केला.