पावसाने तारले तरच नागरिकांची पाणीटंचाईतून सुटका
रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस सुरू झाला असला तरी पावसाने अजूनही जोर पकडलेला नाही .जर सातत्याने पाऊस सुरू झाला तरच रत्नागिरी कराचीपाणीटंचाईतून सुटका होईल असे दिसते आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱया हरचेरी धरणातील पाणीसाठा संपला आहे. सध्या एमआयडीसी शिपोशी धरणातून पाणी विकत घेत आहे. एमआयडीसीकडून उद्योजकांना व आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. धरणातील असलेल्या पाणी साठ्याचा वापर केला जात आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामपंचायतींमध्ये दोन किंवा तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्याची झळ नागरिकांना बसत आहे. आता पावसाने सातत्य राखले तरच पाणीटंचाई मधून नागरिकांची सुटका होणार आहे.