
खेड तालुक्यातील लोटे व धामणदेवी येथील युवासेनेच्या पदाधिकार्यांनी राबविली महामार्गावर फिरणार्या मोकाट गुरांचे शिंगाना रेडियम लावण्याची मोहीम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी मोकाट गुरांचा ठिय्या असतो. वातावरणातील धुके, पाऊस, रस्त्यावरची धूळ यामुळे अनेक वेळा ती जनावरे बसलेली दिसत नाहीत. आणि वाहनांचे धडक बसून अपघात होतात. या अपघातात मोकाट गुरे जखमी होतात तर अनेकांचा मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे अशा मोकाट जनावरांचे होणारे अपघात टाळण्यासाठी खेड तालुक्यातील लोटे व धामणदेवी येथील युवासेनेच्या पदाधिकार्यांनी नामी शक्कल लढविली आहे. रात्रीच्यावेळी महामार्गावर फिरणार्या मोकाट गुरांना पकडून त्यांच्या शिंगांना व गळ्यात रेडीयम लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
नियमित प्रवास करणारे वाहन चालक तसेच परिसरातील नागरिकांनी युवासेनेच्या या उपक्रमाचे कौतूक केले आहे. युवासेनेचे उपतालुका अधिकारी विक्रांत साने, विभाग अधिकारी सुरज मोगरे, सुरज रेवणे, हर्षदीप आंबे, युवासेना समन्वयक किरण ठसाळे, उद्योजक मेघराज आंबे, आय.टी.सेल अधिकारी सुमित चव्हाण, शाखाधिकारी ओंकार चाळके, मयुर आंबे, सचिव ओंकार चव्हाण, उपाधिकारी वैभव कदम, शाखाधिकारी स्वप्निल बहुतले, प्रशांत सावंत, सुरज काते तसेच युवासैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
www.konkantoday.com